नंदुरबार : (जिमाका वृत्त) नंदुरबार उपविभागातील नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील साजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून शासन धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार 14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे सोडत काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कोतवाल भरती समिती तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार मंदार पत्की यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार तालुक्यातील 15 सजामध्ये- करणखेडा, मंगरुळ, ठाणेपाडा, खैराळे, ढेकवद, खामगाव, वाघाळे, वेळावद, पळाशी, पिंपळोद, धानोरा, उमर्दे खु., रनाळा, वैंदाणे व रजाळे.
नवापूर तालुक्यातील 10 सजामध्ये- नवापूर, करंजी बु, धनराट, गडद, नवागांव, विसरवाडी, भरडू, वडफळी, खडकी व डोंग असे एकूण 25 सजांचे कोतवाल पदे रिक्त आहेत.
शासन धोरणानुसार रिक्त पदांच्या 80 टक्के पद संख्या भरण्यासाठी साजांची निवड करणे तसेच 80 टक्के रिक्त साजामधुन निश्चित झालेल्या साजांत शासन धोरणानुसार 30 टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील संबंधीत गावातील नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. पत्की यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.