नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2021 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळांच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

प्रवेशिकेसाठी 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद पाकीटावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार, 2021 साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख असावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.

स्पर्धेची अधिक माहिती व प्रवेशिकाअर्ज महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या  www.sahitya.marathi.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  लेखक, प्रकाशकांच्या सोईसाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तर अन्य ठिकाणी राहणाऱ्या लेखक व प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखेत नियमावली व प्रवेशिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मुंबई शहर व  मुंबई उपनगर वगळून संबंधित जिल्ह्याच्या लेखक व प्रकाशकांनी प्रवेशिका पूर्णत: भरुन पुस्तकांच्या दोन प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये 31 जानेवारी 2022 पर्यंत पाठवाव्यात. असे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.