नंदुरबार (प्रतिनिधी) – सार्वजनिक शिक्षण समिती संचलित नंदुरबार येथील स्वातंत्र्यसैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जल्लोषात पार पडले. कार्यक्रमामध्ये शाळेतील जवळपास 50 कार्यक्रमात750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक वर्गसंघाने वेगवेगळ्या विषयांवर नृत्य सादर केले. कार्यक्रम दोन विभागात घेण्यात आले. पहिल्या भागातील सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटक तहसीलदार मा.श्री. नितीन गर्जे साहेब यांनी उद्घाटन केले. पहिली वर्गसंघाने भारतीय राज्यांचे लोकनृत्य तर चौथी वर्गसंघाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. दुसऱ्या भागात उद्घाटक मा. श्री. सतिष चौधरी साहेब (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. नंदुरबार) ,गटशिक्षणाधिकारी मा श्री निलेश पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी मा श्री एस अन पाटील यांनी उद्घाटन केले. मा श्री सतिष चौधरी यांनी आपल्या मनोगतात गुणवत्तापूर्ण,दर्जेदार शिक्षण देणारी तसेच विद्यार्थीहीत व समाजहित जपणारी उपक्रमशील शाळा असल्याचे नमूद केले. दुसरी वर्गसंघाने समाज प्रबोधन करणा-या गाण्यांवर नृत्य सादर केले तर तिसरी वर्गसंघाने राम जन्मापासून,सिता स्वयंवर,सिता हरण, संजीवनी पर्वत, राम राज्याभिषेक,प्राणप्रतिष्ठा पर्यंतचे रामायण दर्शन घडविले. यावेळी मा.ॲड.श्री. रमणभाई शाह (सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन, मा.डॉ.श्री. योगेशभाई देसाई (सार्वजनिक शिक्षण समितीचे सचिव), मार्गदर्शक मा.श्री. मनिषभाई शाह, मा.सौ. सुषमा शाह प्राचार्या श्रॉफ हायस्कूल, मा.सौ. मिनाक्षी भदाणे ,मुख्याध्यापिका आदर्श मराठी विद्यामंदिर, मा.श्री. भद्रेश त्रिवेदी मा.सौ. पूनम गिरी, प्रा.डॉ. युवराज पाटील व इतर मान्यवर पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख हरिष चौधरी तसेच तुषार सोनवणे,प्रमोद खैरनार,मनोज वानखेडे यांनी विशेष सहकार्य केले.प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे यांनी प्रत्येकाला आपले कलागुण दाखविण्यासाठी संधी मिळायला हवी म्हणून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबाबत सांगितले.सुत्रसंचलन अशोक सोनार,माधुरी पवार, शितल अजबे, श्रुती शिंदे, शिवम बोरसे यांनी केले. व संपूर्ण शालेय परिवाराने उत्स्फूर्त सहभाग घेतला.अनंतकुमार सुर्यवंशी,सुधीर पाटील यांसारख्या पालकांनी लेखी स्वरूपात कौतुकास्पद अभिप्राय दिले. सर्वच शिक्षक बंधू, भगिनी यांचे सहकार्य लाभले.