नंदुरबार,(जिमाका वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त केंद्रशासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील उद्योजकांसाठी स्टॅड अप इंडियाही योजना सुरु केली असून त्यासाठी अर्ज सादर करावे. असे आवाहन सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
स्टँड अप योजनेंर्गत जिल्ह्यातील सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवाबौध्द घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत फ्रंट ॲण्ड सबसिडी अनुषंगाने नव उद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के अनुदान देण्यात येईल. पात्र नवउद्योजकांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा.