नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बटावर 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यासाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी  यांचे व्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात वरील कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.