नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  नंदुरबार जिल्ह्यात 29 डिसेंबर ते 12 जानेवारी 2021 या कालावधीत श्री दत्तजयंती निमित्त सारंगखेडामार्गे  होणाऱ्या वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.    श्री दत्त जयंती उत्सवादरम्यान 28 डिसेंबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपासून ते 13 जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावरील शहादा, सारंगखेडा , दोंडाईचाकडे जाणारे जड वाहनांना (उदा. ट्रेलर, चारचाकरी वाहनांची वाहतूक करणारी वाहने, कारखान्याची मशिनरी वाहतूक करणारी वाहने ) सारंगखेडा रोडमार्गे घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

                      गुजरात राज्यातून अक्कलकुवा- तळोदा-शहादा-सारंगखेडा मार्गे सोनगीर-धुळेकडे जाणारी अवजड वाहने ही शहादा-अनरद बारी – वडाळी-शिरपूर मार्गे सोनगीर-धुळेकडे जातील किंवा तळोदा- प्रकाशा-नंदुरबार-दोंडाईचा मार्गे सोनगीर-धुळेकडे जातील.

                      धुळेकडून सोनगीर फाटा-दोंडाईचा-सारंगखेडा मार्गे शहादाकडे येणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुली-नंदुरबार-प्रकाशामार्गे शहादाकडे जातील किंवा सोनगीर फाटा-शिरपूर-वडाळी- अनरदबारी मार्गे शहादाकडे जातील असे प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी कळविले आहे.