*नंदुरबार (जगदीश ठाकुर)*- महाआघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिलं होतं. परंतु सरकारने कुठलीही मदत न देता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. म्हणून सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करून भाजपाने एल्गार पुकारला. आघाडी सरकारने दिलेले आश्वासन पाडून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी भाजपाने यावेळी केली. नंदुरबार येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राजेंद्रकुमार गावित, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, तालुका अध्यक्ष रवींद्र चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक कमल ठाकूर, माणिक माळी, राजेंद्र गावित, पंचायत समितीच्या उपसभापती लताबाई पटेल, नगरसेविका संगीता सोनवणे, सविता जयस्वाल खुषाल चौधरी, पंकज पाठक, महेंद्र पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर भाजपाच्या जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.