नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती जिल्ह्यात दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत आहे.
या सप्ताहांच्या अनुषगांने 12 एप्रिल रोजी अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली जि.नंदुरबार येथे स्टॅन्ड अप इंडिया अंतर्गत मार्जिन मनी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेला समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.बेनकुळे, कार्यालयीन अधीक्षक दिलीप कोकणी, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, प्रदीप वसावे, गृहपाल गणेश देवरे, समाज कल्याण विभागातील निवासी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री.बेनकुळे यांनी मार्जिन मनी योजनेविषयी शासनाचे धोरण, अटी, नियम,पात्रता व उद्योजकाविषयी महत्व तसेच बँकेमध्ये प्रस्ताव सादर करतांना उद्योजकाकडे कोणती कागदपत्रे, नाहरकत प्रमाणपत्रे असावीत या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी विविध बँकेकडून, महामंडळाकडू कर्ज घेतलेल्या व वेळेवर कर्ज परतफेड केलेल्या उद्योजकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सहायक आयुक्त नांदगांवकर यांनी स्टॅण्ड अप योजनेचे महत्व विषद केले.
मुख्याध्यापिका श्रीमती.बोरसे यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रमोद पवार यांनी केले.