शहादा (प्रतिनिधी):- येथील सक्षम टाईम्स च्या प्रतिनिधी श्रीमती सुलभा पवार यांची महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे नंदुबार जिल्हा अध्यक्ष शरद मराठे, विजय सुर्यवंशी यांनी ही निवड नुकतीच जाहीर केली आहे. पत्रकारितेत आपल्या धङाङीने व कार्यकुशलतेने स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या तसेच प्रत्येकाशी हसतमुख व विनम्रतेने वागून माणसं कमावण्याची कला अवगत असणा-या सुलभा पवार यांना पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.