नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत जिल्ह्यात गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नंदुरबार, होळ तर्फे हवेली येथील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह आणि शहादा येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थीनींना विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, सकाळी नाश्ता, मोफत वह्या व पुस्तके आणि शासनामार्फत दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित वसतीगृहाच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करून घ्यावा. परिपूर्ण भरलेल्या अर्जासह शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, वैद्यकीय दाखला वसतीगृहात सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुंदरसिंह वसावे यांनी केले आहे.