नंदुरबार (जिमाका वृत्त) – शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (होळ तर्फे हवेली) नंदुरबार या शासकीय वसतीगृहाची सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी, अनुसुचित जातीच्या विद्यार्थिनींकडून रिक्त जागांवर प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती गृहपाल सुषमा मोरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
वसतीगृहातील रिक्त जागांवर जागेवरच प्रवेश देण्यात येणार असून प्रवेशित मुलींना मोफत निवास, भोजन, नाश्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, सहल खर्च, तसेच दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल.
प्रवेशासाठी अर्जासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक, उत्पनाचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक पहिल्या पानाची छायाकिंत प्रत, बोनाफाइड, पैसे भरल्याची पावती, वैद्यकीय दाखला सादर करावा. प्रथम येणाऱ्या प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार असून प्रवेशासाठी गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह होळ तर्फे हवेली नंदुरबार भ्रमणध्वनी क्रमांक ९५२७५०५८९५, ९८८१९०३३१३ यावर संपर्क साधावा असेही गृहपाल श्रीमती मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.