नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व युवकमित्र परिवार नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 8 मे 2021 रोजी शहादा शहरातील शासकीय विश्रामगृह सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात रक्तदान करण्याची इच्छा असणाऱ्यांनी 9529125396 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच नांव नोंदणीसाठी https://www.yuvakmitra.org/contact या लिंकवर आपली माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.