नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : विमला सुखिदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे जिल्ह्यासाठी 70 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र भारतीय जैन संघाने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, बीजेएसचे गौतम जैन तातेड, अशोक तातेड, उत्सव तातेड, पृथ्वीराज जैन, सुरेश तातेड आदी उपस्थित होते.
हे सर्व यंत्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. यापूर्वीदेखील तातेड ओसवाल परिवाराने जिल्ह्यासाठी 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि एक रुग्णवाहिका भेट दिली आहे.