नंदुरबार (प्रतिनिधी) : नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधि महाविद्यालय नंदुरबार, विध्यार्थी विकास विभाग अंतर्गत दिनांक ९ ऑगस्ट 2023, रोजी आदिवासी दिवस व क्रांतिकारी दिवस या निमित्ताने “भारतातील आदिवासी लोकांचे घटनात्मक अधिकार” विषयावरती ऑनलाइन पद्धतीद्वारे, कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉ.आशा तिवारी यांनी आदिवासी समाजातील क्रांतिकारी बिरसा मुंडा, रामदासजी, शिरीष मेहता यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. संविधानाचे महत्त्व ,आदिवासी समाजाचे अधिकार व आदिवासी बांधवांना येणाऱ्या अडचणी या विषयावर मा.प्राचार्य डॉ.एन.डी .चौधरी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आदिवासी माणसापर्यंत कायद्याची माहिती पोहोचली पाहिजे, त्यांची संस्कृती जोपासली गेलीपाहिजे याबद्दल प्राचार्य डॉ. एन.डी. चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यासाठी आव्हान केले.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन विद्यार्थी विभाग प्रमुख डॉ. आशा तिवारी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सहा.विद्यार्थी विभाग प्रमुख प्रो.आर. एन. नगराळे यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचा आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री चंद्रकांतजी रघुवंशी, उपाध्यक्ष मा.श्री मनोज रघुवंशी तसेच संचालक मंडळाने प्रोत्साहन दिले.