नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य इतरमागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी राज्य व देशांतर्गत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु केली असून या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे नंदुरबार जिल्हा व्यवस्थापकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राज्यातील इतर मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य व देशांतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष तर परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष बिनव्याजी शैक्षणिक कर्ज योजना सुरु केली आहे. या योजनेत वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायकि व व्यवस्थापकीय,कृषी, अन्न प्रकिया व पशुविज्ञान, या संबंधातील शासनमान्य मान्यता प्राप्त विद्यापीठांनी, केंद्रीय परिषदांची मान्यता असलेल्या राज्यांतर्गत शैक्षणिक संस्थामधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांने देशातंर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमांसाठी 20 लक्षच्या मर्यादेत बँकेने कर्ज मंजुर केलेल्या कर्जाचे विद्यार्थ्यांने वेळेत हप्ते भरल्यास त्यामधील व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत विद्यार्थ्यांच्या आधारलिंग खात्यात महामंडळामार्फत व्याज परतावा जमा करण्यात येईल.
यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वय 17 ते 30 असावे. इयत्ता बारावीत 60 टक्के गुणांसह पास असलेले विद्यार्थी पात्र राहतील. पदवीच्या द्वितीय वर्ष व्यवसायकि अभ्यासक्रमासाठी 60 टक्के गुणासह पदविका तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिंक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागकरीता 8 लक्ष असावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने www.msobcfdc.org या संकेतस्थवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पहिला मजला, टोकर तलाव रोड, नंदुरबार ( 02564-210062 ) येथे संपर्क साधावा.