नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांच्या कच्च्या व पक्क्या वाहन परवान्याच्या (अनुज्ञप्ती) कामकाजासाठी मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. 28 ऑगस्ट, 21 सप्टेंबर 26 ऑक्टोंबर, 30 नोव्हेंबर व 30 डिसेंबर 2023 या दिवसांना अक्कलकुवा तालुक्यात मासिक दौरा होणार असल्याचेही श्री. बिडकर यांनी कळविले आहे.