नंदुरबार (जिमाका वृत्त) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी 24 ऑगस्ट 2023 रोजी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार शहरातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नगरपरिषदेजवळ सकाळी 10-30 ते दुपारी 4-00 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनचालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा व आपली आरोग्य व नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही श्री. बिडकर यांनी केले आहे.