नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2021 ही 3 एप्रिल 2022 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार जी.टी. पाटील महाविद्यालय आय.टी.आय जवळ, शनि मंदिर रोड, नंदुरबार,श्रीमती. दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मुख्य डाक कार्यालय जवळ, नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय, नेहरु चौक, स्टेशन रोड, नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर महाविद्यालय, नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, मुख्य डाक कार्यालय जवळ, अधांरे स्टॉप, नंदुरबार अशा 6 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.