नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी फोर्स कंपनीच्या 7 वातानुकूलीत रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिका रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते. या रुग्णवाहिका नवापूर आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय विसरवाडी, खांडबारा, म्हसावद, अक्कलकुवा, तोरणमाळ या ठिकाणी उपयोगात आणल्या जातील.
जिल्ह्याच्या जनतेला रुग्णवाहिकांचा चांगला उपयोग होईल असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी आतापर्यंत विविध माध्यमातून 42 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी रुग्णवाहिका उपयुक्त ठरत आहेत.