नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मोलगी अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून 6 जुलै 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकात्मिक बालविकास सेवा योजना मोलगी प्रकल्पातंर्गत कंजाणी-1 येथील अंगणवाडी केंद्रातील 1 अंगणवाडी सेविका तर देवमोगरा पुनर्वसन-4, देवमोगरा पुनर्वसन-5, देवमोगरा पुनर्वसन 6 आणि भागतफळी अंगणवाडी केंद्रातील 4 मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी अर्ज  मागविण्यात आले आहेत.

तसेच काठी-3, पाटफळी, मालपाडा, महुफली, पोहरा, ईटवाई अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाच्या 6 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणाडी सेविका, व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, मोलगी, पंचायत समिती, ता.अक्कलकुवा येथे  संपर्क साधावा.