ज्ञानवंत तू, किर्तीवंत तू, अढळ तुझे स्थान

स्वाभीमानी तू, श्रेष्ठदानी तू, स्थान तुझे मनात।।

या ओळी आहेत, आपल्या सर्वांच्या मनातील आदराचे स्थान डॉ. कैलास चौधरी सर यांच्यासाठी. आज ५ जानेवारी, डॉ. कैलास चौधरी सर यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे संतुलीत व अष्टपैलू व्यक्तीमत्त्व विद्यार्थ्यांपुढे प्रेरणा म्हणून ठेवावे, या उद्देशाने सदर लेख लिहीत आहे. डॉ. कैलास चौधरी सर, शिक्षण एम. ए. ( इंग्रजी ) एम. एड., पीएच. डी., नेट ( शिक्षणशास्त्र ) शिक्षणशास्त्र महाविद्यालयात २००८ पासून कार्यरत. एवढ्या कमी वयाच्या व्यक्तीकडून विद्यार्थी कोणती प्रेरणा घेऊ शकतील ? कोणत्या क्षेत्रात त्यांची विशेष कामगिरी आहे ? असे प्रश्न स्वाभाविकच मनात निर्माण होतील. डॉ. कैलास चौधरी सर, खरंच एक आगळंवेगळं व्यक्तीमत्व, स्वतःच्या वागणूकीतून आदर्श निर्माण करणारं व्यक्तीमत्त्व. काही गोष्ट अशा असतात की असं वाटतं, या गोष्टी फक्त पुस्तकांतच असतात, संत फक्त इतिहासातच असतात, शिक्षणाचं काम फक्त शिक्षणतज्ज्ञच करतात. पण या सर्व कल्पना साक्षात उतरवणारे, सहजपणे या सर्व गोष्टी जगणारे आहेत, ते म्हणजे डॉ. कैलास चौधरी सर … संत म्हणजे काय ? हे अभ्यासात असतांना मी वाचलं, ” खोटं न बोलणं, कोणाला न दुखावणं, कोणाचे अहित न करणं, दुसऱ्याच भलं करणं, हा आपला धर्म आहे. हे समजणे ही लक्षणे ज्यात आहेत तो संत ” तसेच ” इतरांना मान देणारे, अभिमान रहीत, धैर्यवान, धर्माच ज्ञान असणारे व त्यानुसार आचरण करणारे ते संत ” ज्यांच्यात श्रद्धा, क्षमा, मैत्री, दया, प्रसन्नता आहे. वैराग्य, विवेक, विनय, विज्ञान ( अध्यात्मज्ञान ) यांचे ज्ञान आहे तो संत थोडक्यात ज्यांच्यात जगाचं कल्याण करण्याची क्षमता आहे ते संत ” एवढे सर्व गुण वाचल्यानंतर अनेक नाही तर एकमेव व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येतं, आणि ते म्हणजे डॉ. कैलास चौधरी सर. सरांचे कार्य सर्वांसाठीच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यापीठ, नातेसंबंध या सर्वांसाठीच आहे.

१. विद्यार्थ्यांसाठीचे कार्य

अ) अध्यापन : प्राध्यापक म्हणून काम करत असतांना शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे अध्यापन सरांच अध्यापन अतिशय प्रभावी आहे. अध्यापनाच्या वेगवेगळ्या पध्दती वापरुन ते अध्यापन करत असतात. वेळ कोणती आहे ? गरज काय आहे ? विद्यार्थ्यांची मन : स्थिती काय आहे ? या सर्वांचा विचार करुन ते अध्यापन पध्दती वापरत असतात.

आ) मूल्यरुजवणूक : विद्यार्थ्यांचा केवळ बौध्दीक विकास पुरेसा नाही, तर विद्यार्थ्यांना समाजाचा आदर्श नागरीक बनविण्यासाठी त्यांच्यात मूल्यरुजवणूक करणे आवश्यक आहे. याची जाण ते दरदिवशी ठेवत असतात. स्वत : च्या वागणूकीतून तर ते आदर्श उभा करतात. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यरुजवणूकीसाठी ते स तत प्रयत्नशील असतात. छोट्याश्या बोधकथेतून विद्यार्थी खूप काही शिकू शकतात हा त्यांचा ठाम विश्वास आहे.

इ) विद्यार्थ्यांच्या समस्या : विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींचा विचार करणं, गरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना विद्यार्थी हित योजना राबवन त्यांना योग्य ती मदत करणं याकडे सर विशेष लक्ष देतात.

हे त्यांचे कार्य म्हणावे तितके सोपे नाही. संपूर्ण अभ्यासक्रम यांत वेगवेगळे विषय सर्व मेथड म्हणजे. शालेय सर्व विषय यांत मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचा समावेश, एकाच व्यक्तीने या सर्व विषयांचा अभ्यास करून त्यावर उत्कृष्ट व्हीडीओ तयार करणं यासाठी प्रचंड मेहनत व बुध्दीमत्ता आवश्यक असते. सर्व कामाचा व्याप आपण पाहीला तर किमान दहा व्यक्तींच काम सर एकट्याने करीत आहेत. फक्त विद्यार्थ्यांच्या हिताकरीता विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वीनामूल्य एवढं कार्य करणं साध्या माणसाला शक्य नाही. त्यासाठी मोठ मन लागत कैलास सरांसारखं, • WiFi त्यांच्याकडे बुध्दीमत्ता आहे, इतरांपेक्षा वेगळे करण्याच्या कल्पना आहेत, त्यांच्याजवळ क्षमता आहेत, तंत्रज्ञानाचे विविध स्त्रोत त्यांच्याजवळ आहेत, तंत्रज्ञान वापरण्याचं कौशल्य सरांजवळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांसाठी करण्याची तळमळ त्यांच्याजवळ आहे. ज्यामुळे सर हे सर्व करु शकतात.

२. प्राध्यापकांसाठीचे कार्य : ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कार्य अनमोल आहे. तसेच प्राध्यापकांसाठी त्यांचे कार्य अनिवार्य आहे. २००८ ला ६ वा वेतन आयोग लागू झाला आणि प्राध्यापकांच्या प्रमोशनच स्वरूप अचानक बदलून गेलं. प्राध्यापकांच्या प्रमोशनसाठीच API करणं अनविर्य झालं, बदललेल्या नियमांचं वाचन करणं, ते समजून घेणं, त्यानुसार कामकाज करणं, अनेकांसाठी अवघड झालं. परंतू कैलास सरांचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे, त्याचं आकलन चांगलं आहे, त्यांनी स्वत : ते समजून घेतलं, आणि अनेक प्राध्यापकांना याबाबत त्यांनी मदत व मार्गदर्शन केलं. मदत करत असतांना त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा गर्व वाटत नाही तर इतरांना मदत केल्याच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं. इतरांसाठी इतका वेळ खर्च करणं, मेहनत करणं, बर्याच वेळा स्वत : चा पैसा खर्च करणं इतकं देण्याचं फक्त निसर्गाला जमू शकतं आणि कैलास सरांना निसर्ग जर्स फक्त देत राहतो, सूर्य प्रकाश देतो, वनस्पती ऑक्सीजन देतात, त्यांना फक्त देणे माहित असते, परत फेडीची अपेक्षा नसते. पण मानवामध्येही तशी वृत्ती असू शकते ह सिध्द होते कैलास सरांच्या रुपामध्ये.

३. विद्यापीठ कामकाज : विद्यापीठाचे सर्वप्रकारचे कामकाज अगदी चोख आणि प्रामाणिकपणे करत असतात. यात प्राध्यापक व इतर कर्मचारी यांच्याशी अतिशय सहकार्याची व सांमजस्याची वागणूक असते. परंतू तेथे काम करणारी जी मुले असतात त्यांच्याशीही सर किती आपुलकीने वागतात याचा प्रत्यय आम्ही कामानिमित्त सरांसोबत विद्यापीठात गेलो तेव्हा आला. तीथे काम करणारा एक मुलगा स्वतःहून सरांकडे आला. हातातली बॅग मागू लागला. सरांनी नकार देऊनही हसून सरांच्या हातातील बॅग त्याने घेतली. बॅग विशेष जड नव्हती, पण ती बॅग सरांच्या हातातून घेऊन सरांसोबत चालत होता तेव्हा त्याच्या मनातील सरांविषयीची आत्मीयता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येत होती. सरांनीही हे ओळखलं असेल म्हणून त्याला ती बॅग धरु दिली. एखादी व्यक्ती असा सन्मान देत असेल तर त्यातून त्याचे व्यक्तीमत्व दिसते. आपल्यापेक्षा वरिष्ठांशी सर्वच जण चांगलं वागतात, पण तळागळातल्या व्यक्तींशी आपली वागणूक समानतेची ठेवणं, हे नक्कीच कैलास सरांच्या व्यक्तीमत्वातून शिकता येतं.

४. नातेसंबंध : नातेसंबंध जपणं ‘ हे शिकावं तर कैलास सरांकडून त्यांचे नातेसंबंध त्यांचे दोन भाऊ व त्यांचा परिवार, तसेच त्यांच्या सहचारिणीच्या दोन बहिणी व त्यांचा परिवार एवढा सीमित नाही, या सर्वांचे तर ते मार्गदर्शक आहेतच, सहकार्यभावना त्यांच्यासाठी तर आहेतच पण त्यांच्या सहवासात येणारे सर्वाशी सर आत्मीयतेचे नातेसंबंध ठेवत असतात. सुख – दुःखात सहभागी होणे, योग्य मार्गदर्शन करणे, वेळप्रसंगी मदत करणे हे अगदी सहजतेने सर करत असतात. सर नेहमी इतरांच्या भावना जपतात, इतरांना योग्य सन्मान देतात. सतत देत रहाणं, हेच त्यांना माहित आहे करत असतांना देत असतांना याची परतफेड मला काय मिळेल ? केव्हा मिळेल ? असा विचारही त्यांच्या मनात येत नाही परंतू जीवनाचा नियम आहे आपण जे करतो तेच आपल्याला परत मिळतं. ” Give and Take ” या सूत्रानुसार आणि म्हणूनच सरांच्या वलयात असणाऱ्या सर्वांच्या मनात सरांबद्दल इतकं आदराचं स्थान आहे की सरांच्या येण्याने, बोलण्याने किंबहुना फक्त सरांच नाव जरी निघालं की प्रत्येकाच्या मनात आनंदाची, आत्मीयतेची, साळीकतेची, पावित्र्याची आनंदमय लहर निर्माण होते. सर कुठलीही अपेक्षा न ठेवता कार्य करीत असतात, तरीही मात्र सर्व जण त्यांना अगदी भरभरुन देत असतात, आणि ते म्हणजे ” आशिर्वाद सर जेव्हा एखादी मदत करतात तेव्हा त्यांच्यासाठी धन्यवाद शब्दाऐवजी मनापासून आर्शिर्वाद जीभेवर येतात आणि त्यांचा स्वीकार सर तेवढ्याच आत्मीयतेने करतात, हे मात्र निश्चित.

अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वाकडून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांच्या स्वभावातून, वागणूकीतून काही आदर्श शिकावे असे मला वाटते ते म्हणजे

१. विद्या विनयेन शोभते – सरांजवळ शिक्षण आहे, तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे तंत्रज्ञानाचं कौशल्य आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. या सर्व गोष्टी जरी त्यांच्याजवळ आहे पण यांचा त्यांना अहंकार किंवा गर्व नाही तर त्यांच्या अंगी अतिशय नम्रता आहे. नम्रतेवरुन विद्वता सिध्द होत असते.

२. सतत कार्यमग्न रहा रिकामं मन सैतानाच धन असं म्हणतात. सर नेहमी कार्यमग्न असतात आणि म्हणूनच ते एवढ विधायक काम करु शकतात. सतत Relax दिसतात. उलट इतरांचं ताण ही ते हलकेफुलके विनोद करुन, Relax वातावरण तयार करत असतात.

३. योग्य ठिकाणी योग्य बोला : – बोलणं हा व्यक्तीमत्त्वाचा खूप महत्वाचा भाग आहे, योग्य ठिकाणी योग्य बोलता आलं पाहिजे. केव्हा काय बोलावं, याला खूप महत्त्व असतं. सर बोलतांना खर बोलायला घाबरत नाही, आणि खोट बोलून वेळ मारून नेऊ अस कधी करत नाही. विचारपूर्वक प्रत्येक शब्द बोलत असतात.

४. इतरांपेक्षा वेगळा विचार : – इतर काय म्हणतील ? याचा विचार न करता सर स्वतःशी प्रामाणिक राहतात. इतरांबद्दल पाठीमागे चांगलं बोलणं, आणि काही चूक सांगायची असेल तर तोंडावर सांगतात, या वागणूकीमुळे इतरांच्या मनात एक विश्वासाचं नात त्यांनी निर्माण केलं आहे.

५. देत रहा :- आपल्याजवळ काय आहे ? इतरांना काय देता येईल ? कोणाची गरज काय आहे ? याचा विचार करुन देत रहा, मोबदला काय मिळेल ? याचा विचार करु नका, दुसर्याच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न करा.

६. दुसर्याच्या भावना जपा : – प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात इतरांच्या सुखदुखात सहभागी व्हा आपण सहभागी झाल्यामुळे त्यांचे सुख, आनंद व्दिगुणीत होईल तर दु : खाची मात्रा कमी होईल. इतरांच्या भूमिकेत जाऊन त्यांचा विचार करा. समानुभूतीनुसार विचार करुन त्यानुसार वागा.

७. व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव :- व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव तुमची वागणूक, चारित्र्य, स्वभाव, वृत्ती, यांवर अवलंबून असतो या सर्वांचा प्रभाव इतरांवर राहील असे वागा.

८. आत्मसंतृष्टी : – यश पैसा यामागे धाऊ नका तर तुमचे कार्य असे ठेवा, आत्मसंतृष्ठी ठेवा त्यामुळे यश आणि पैसा तुमच्यामागे धावेल,

९. भिती बाळगू नका : अपयशाला घाबरु नका, परिस्थितीला घाबरु नका, भिती असली की मनुष्य प्रगती करु शकत नाही. भिती सोडा आणि यशाकडे झेप घ्या.

१०. कारणे शोधू नका : – ज्यांना करायचे नसते, ते अनेक कारणे सांगतात व ज्यांना करायचे असते, ते मार्ग शोधतात म्हणून मार्ग शोधा, कारणे शोधू नका,

११. स्वतः वर ठाम विश्वास ठेवा : – मी हे करु शकेल, असा ठाम विश्वास ठेवा, त्यासाठी अविरत प्रयत्न करा. स्वत : वर विश्वास ठेवा, कोणी मदत करेल याची वाट पाहून नका.

सरांचे हे गुण जर तुम्ही अंगीकारले तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल यात शंका नाही. सतत दुसर्याच हित पहाणारे, इतरांच्या हितासाठी झटणारे, इतरांना मदत करणं, स्वतःचा धर्म समजणारे मानवतेचे पूजारी डॉ. कैलास चौधरी सर यांना वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.

त्यांच्यासाठी केलेली एक छोटीशी कविता

झेप आहे गरुडासारखी

पाय तरीही जमिनीव

बुद्धीमत्ता सूर्यासारखी

वृत्ती तरीही पणतीची || १ ||

देण्यात मानती आनंद

लोभ नाही घेण्यात

एकजूट ठेवण्यात स्वानंद

म्हणूनच चित्ती समाधान || २ ||

स्वकर्तृत्वार आहे विश्वास

नाही अपेक्षा आधाराची

घासामधला देती घास

नाही घमेंड परोपकाराची || ३ ||

करता एखादा निश्चय

त्याकडेच सर्व चित्तवृत्ती

ध्येयपूर्ती पर्यंत नाही विश्राम

जिद्दपूर्तीची सर्वभूती || ४ ।।

कर्तव्य आणि जबाबदारीने

केले स्वत : ला स्वयंसिध्द

म्हणूनच म्हणता येईल

तुम्हाला चालतं फिरतं अध्यात्म || ५ || 

प्रा. डॉ. विजया विठ्ठल बाविस्कर

नं. ता. वि. स. चे

शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार