नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला  व बाल विकास अधिकारी कार्यालय, रुम नं 226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047 ) येथे संपर्क करावा, असे सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी कळविले आहे