नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराणा प्रताप जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, महेश सुधरकर, संदीप कदम, स्वीय सहायक सुभाष शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.