नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): खरीप-२०२३ हंगामासाठी महाबीज बियाणेची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. या हंगामासाठी महाबीजकडून पुरेश्या प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे रास्त दरानेच खरेदी करावेत. असे आवाहन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक, बाबासाहेब कोटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
बियाण्याचे दर पुढीलप्रमाणे
पिक, उपलब्ध वाण व बॅगची साईज (किलोमध्ये) तर विक्री दर प्रति बॅग (रु.)- सोयाबीन- जेएस-335, जेएस-9305, डीएस-228, एमऐयूएस-71-30 किलो बॅग, 2730 रु. दर, फुले संगम, फुले किमया, एमऐयूएस -612, 162-20 किलो बॅग 2040 रु. दर, एमएसीएस-1188,1281, एमयूएस -158- 30 किलो, 3060 रु. आहे.
भात-इंद्रायणी-10 किलो बॅग 660 रु. दर, 25 किलो 1600 रु. दर, कोईमतूर-51-25 किलो, 1075 रु. दर, मुग-उत्कर्षा, पीकेव्हीएम-4, बी.एम-2003-2 व इतर वाण-2 किलो, 360 रु. दर, 5 किलो, 875 रु. दर, तुर- बीडीएसन-716, फुले राजेश्वर पीकेव्ही तारा -2 किलो, 390 रु. दर, बीडीएन-711, बीएसएमआर-736, मारुती, आयसीपीएस-87119 (आशा)- 2 किलो, 360 रु. दर,
उडिद-एकेयु 10-1 (बॅल्क गोल्ड), टीएक्यू-1, 2 किलो बॅग 350 रु. दर, 5 किलो, 850 रु. दर, संकरित ज्वारी- सीएसएच-9, महाबीज-7, सीएसएच -14, भाग्यलक्ष्मी-२९६- 3 किलो, 420 रु. दर, संकरीत बाजरी- महाबीज 1005- 1.5 किलो, 240 रु. दर, सुधारित बाजरी- धनशक्ती- 1.5 किलो, 165 रु. दर, नागली- फुले नाचणी- 1 किलो, 110 रु. दर, संकरित- सुर्यफूल- 500 ग्रॅम, 150 रु. दर याप्रमाणे असतील.
तरी सर्व शेतकरी बांधवानी महाबीज बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे. कोठेही जास्त दराने विक्री होत असेल तर मोबाईल क्रमांक 8669642726 वर संपर्क साधावा. असेही श्री. कोटकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.