नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, सामाजिक, कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाजसेवक यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीं व संस्थानी ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी 15 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिकासाठी क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींसाठी एक पुरस्कार तर वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेसाठी एक असे दोन पुरस्कार देण्यात येतात.
सन 2018-2019,2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या चार वर्षांचा एकत्रित पुरस्कार देण्यात येणार असल्याने या चार वर्षांसाठी चार वेगवेगळे अर्ज सादर करावे. पुरस्काराच्या अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्जासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,नंदुरबार यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.