नंदुरबार (जिमाका वृत्त) : महसुल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत असून या सप्ताहाच्या औचित्याने जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या 9 बालकांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, परिविक्षा अधिकारी ( बाल विकास), सुनिल पवार चिटणीस अनिल गवांदे आदि उपस्थित होते.