नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागासाठी पाच अद्ययावत रोव्हर यंत्र उपलब्ध झाले असून त्यांचे तालुकानिहाय वितरण जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी प्रशांत बिलोलीकर, उप अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गावित, शांताराम उशिरे, सतिष बोरसे, श्रीरामचंद्र कुवर, शिबल्या वळवी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी रोव्हर यंत्राची माहिती घेवून यंत्राचा कार्यक्षमतेने उपयोगाच्या सुचना भूमी अभिलेख विभागास दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेच्या माध्यमातून 95 लाख 89 हजार इतका निधी हे यंत्र व इतर अनुषंगिक साहित्य घेण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. हे नवे यंत्र प्राप्त झाल्याने नियमित मोजणी कामकाजासोबत खनिकर्म, वनदावे, सरदार सरोवर प्रकल्प बाधितांचे पोटहिस्सा सर्वेक्षण, पुनर्वसन मोजणी कामकाज आणि संपादनाचे मोजणी कामकाज जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
हे यंत्र प्राप्त झाल्यानंतर लायका कंपनीचे अभियंता पराग शेठ, पुष्कर व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली मशीन वापरासंबंधी व माहिती देण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षण यशस्वितेसाठी शिरस्तेदार प्रवीण दुसाणे, गावित, प्रथम लिपिक राजपूत, देविदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.