नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : तालुक्यातील भालेर येथे आयोजित लसीकरण शिबिरात गावातील 45 वर्षावरील 257 व्यक्तींना कोरोना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी आणि लसीकरणाबात गैरसमज पसरवू नका, असे आवाहन डॉ. गावीत यांनी केले. यावेळी गट विकास अधिकारी अशोक पटाईत, डॉ.भास्करराव पाटील, भिका पाटील, जि.प.सदस्य शांताराम पाटील, सरपंच जागृती पाटील, डॉ.के.जी.वसावे, डॉ.राकेश पाटील, ग्रा.वि.अधिकारी सुर्यकांत दशपूते, उपस्थित होते.
भालेर गावात लसीकरणासाठी 526 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी, श्रीमती का.पु.पाटील विद्यालय भालेर, शिवदर्शन विद्यालय भालेरचे कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
उमर्दे खुर्द येथे लसीकरण शिबीराचे आयोजन
ग्रामपंचायत उमर्दे खुर्द येथे आयोजित लसीकरण शिबिरात नोंदणी झालेल्या 650 व्यक्तींपैकी 130 जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, पोलिस पाटील, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.), ग्रामसेवक व गावातील 45 वर्षावरील नागरिक उपस्थित होते.
वाघाळेत 132 जणांना लसीची पहिली मात्रा
ग्रामपंचायत वाघाळे येथे लसीकरणासाठी 505 व्यक्तींची नोंदणी करण्यात आाली आहे. यापैकी 132 व्यक्तींना आज आयोजित शिबिरात लसीची पहिली मात्रा देण्यात आली. शिबिराच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने एकत्रित प्रयत्न केले. शिक्षकांनी नोंदणीसाठी सहकार्य केले. शिबिराला सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, पोलिस पाटील, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.), ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
बलवंड येथे ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण
ग्रामपंचायत बलवंड तर्फे आयोजित लसीकरण शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबिरात 135 जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी श्री.पटाईत यांनी 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आणि कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन केले. गावात 370 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे.