नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रिक करण्यासाठी लागू करण्यात आललेल्या संचारबंदी कालावधीत सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बँका व त्यांचे आऊटलेट आणि टेलिकॉम सेवा सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अनुमती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डिलर सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर, वित्तीय बाजारातील रिझर्व्ह बँकेशी संलग्नित संस्था, विद्युत आणि पाणी पुरवठा संबंधीत कार्यालये, विमा आणि मेडिक्लेम कार्यालये, औषध उत्पादन व वितरणाशी संबंधीत कार्यालये सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. विद्युत, बँक, पाणी, आणि आर्थिक सेवेशी संबंधीत शासकीय कार्यालये व शासकीय महामंडळे पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.