नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत पिरॅमल स्वास्थतर्फे जिल्ह्यातील आरोग्य आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यासाठी 30 हजार एन-95 मास्क भेट देण्यात आले.
पिरॅमल स्वास्थ्यच्या संवाद अधिकारी रंजना पांडे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरुपात मास्क सूपुर्द केले. यावेळी पिरॅमल स्वास्थ्यचे जिल्हा परिवर्तन अधिकारी निलचंद्र शेंडे उपस्थित होते. पिरॅमलतर्फे हे मास्क तालुकास्तरावर वितरीत करण्यात येणार आहे आणि कोविड मार्गदर्शक सूचना व पोषण आहारविषयक माहितीदेखील यावेळी देण्यात येणार आहे.