नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 20 : पिरामल स्वास्थ्य संस्थेतर्फे जिल्ह्यासाठी 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत हे कॉन्सन्ट्रेटर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार राहुल वाघ, पिरॅमल स्वास्थ्यचे निलचंद्र शेंडे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा चांगला उपयोग होईल, असे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. पिरामल स्वास्थ्यतर्फे कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रशासनाला येत्या काळात आणखी सहकार्य करणार असल्याचे श्री.शेंडे म्हणाले.