नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोवीड-19 संकटकाळात पालक मृत्यूमुखी पडलेल्या आणि दोन्ही पालक रुग्णालयांमध्ये दाखल असल्याने त्यांची देखभाल होऊ शकत नसलेल्या बालकांच्या मदतीसाठी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली असून या बालकांना कृती दलाच्या माध्यमातून संपूर्ण संरक्षण, संगोपन, कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कोवीड-19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावल्यामुळे संकटात सापडलेली बालकांची माहिती महिला व बाल विकास विभाग, नंदुरबार यांच्या वतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनिस व पोलीस पाटलांच्या माध्यमातून संकलित करण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या एकही बालकांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
जिल्ह्यातील नागरीकांनी 0 ते 18 वर्ष व 18 ते 30 वर्ष वयोगटातील बालके व तरुण/तरुणी जिल्ह्यात आढळून आल्यास अथवा नागरिकांना अशी माहिती मिळाल्यास महिला व बाल विकास विभाग हेल्पलाईन क्रमांक 8308992222, 7400015518, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार कंट्रोल रुम 02564-210345,210234, बाल कल्याण समिती 9307143016, 9421199281, 9422748491, जिल्हा बाल संरक्षण कक्ष नंदुरबार 9421477143 व चाईल्ड लाईन क्रमांक 1098 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी कळविले आहे.