नंदुरबार (जिमाका वृत्त) समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत शाहू महाराज जयंती निमित्ताने आज समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  या रॅलीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.  

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.  यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढण्यात आली.