नंदुरबार ( प्रतिनिधी) – नंदुरबार येथिल न ता वी समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी एड 2021-23 च्या माध्यमातून बी एड च्या विद्यार्थी शिक्षकांनी तयार केलेल्या शिक्षकांना अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्य चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी संस्थेचे समन्वयक माजी प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी सरांनी फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी सर बी एड चे समन्वयक प्रा मोईन शेख प्रा डॉ युवराज पाटील सर व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते तत्पूर्वी उदघाटना नंतर मान्यवरांनी शैक्षणिक साहित्याचे निरीक्षण करून समाधान व्यक्त करून प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी कल्पकतेने तयार केलेल्या नव नवीन शैक्षणिक साहित्याची आवश्यकता आहे अशी भावना व्यक्त केली सदर प्रदर्शन यशस्वीतेसाठी विद्यार्थी शिक्षक शक्ती धनके , सतीश कटके , कमलेश पाटील यांनी परिश्रम घेतले