अक्कलकुवा :- न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज अक्कलकुवा येथे आज जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला यावेळी गावाच्या सरपंच श्रीमती .राजेश्वरी पाडवी व डॉ. अरुण पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर शाळेचे माजी उप-प्राचार्य श्री .के जी .राजपूत सर यांनी योगाचे महत्त्व व योगासने कोणत्या पध्दतीने व कसे करावे हे सांगितले व करून दाखवले.तसेच सरांचे नातवंडे कु.वेदीका राजपूत ,वेदांत राजपूत, कु.धनश्री राजपूत,व वरद राजपूत यांनी सुध्दा काही प्रात्यक्षिके करून दाखवली. शेवटी शाळेचे प्राचार्य श्री. एच. के. चव्हाण सर यांनी योगाचे फायदे व योग दिवस का साजरा केला जातो या बद्दल माहिती दिली.
यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. व्ही. जे .पटेल सर ,उपप्राचार्य श्री .आर. यु. वळवी सर पर्यवेक्षक श्री .एम. बी .लोहार सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.