नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे  आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत नवापुर तालुक्यातील धनराट, धुडीपाडा, चौकी, रायपूर, बोरझर, खैभडी, वगळापाडा, नागझरी, वडफळी, कोळदा या गावात लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

 कलाछंद पुणेच्या कलापथकामार्फत कोरोना विषयक संदेशाचा प्रचारप्रसार करत असून यावेळी कोरोना लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती बाबत जनजागृती करण्यात येत आहे.