नंदुरबार (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंगभैया रघुवंशी विधी महाविद्यालय, नंदुरबार येथील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “ताण – तणाव मुक्त / कॉपी मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा”, दिनांक १६ ऑक्टोंबर २०२४ ला आयोजित करण्यात आली. परीक्षा आणि विद्यार्थ्यावर येणारा ताण यांचे संयोजन करण्याच्या हेतूने महाविद्यालयातील मा. प्राचार्य प्रा.डॉ.एन डी. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनातून सदरील कार्यशाळा पार पडली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ आशा आर. तिवारी यांनी केले. डॉ. तिवारी मॅडम नी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या हितासाठी, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली व सदर कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केले .
कार्यशाळेतील मार्गदर्शक मा. प्राचार्य डॉ. एन डी. चौधरी यांनी परीक्षा काळातील ताण वेळीच कसा हाताळावा, हे प्रासंगिक उदाहरण देऊन सांगितले. याशिवाय त्यांनी मुलांना सविस्तर समजवले की कोणते कोणते कृत्य हे कॉपी प्रकरणाखाली येऊ शकतात. कॉपी न करता परीक्षा देण्यासाठी मा प्राचार्य चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी अभ्यासाचा नियोजन ,सकारात्मक विचार, योगा, पुरेशी झोप आणि वेळेचा सदूपयोग याद्वारे ताण तणाव कसा कमी करता येईल हे दैनंदिन जीवनातले सोपे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना समजवले.
तसेच कॉपी प्रकारातून विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होते हे उदाहरण देऊन सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. आर. एन. नगराळे सरांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.