नंदुरबार (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशानरुप अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या लांबोळ्याच्या संशयीत महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान आज दिवसभरात ८४ अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
सुरुवातीचे बरेच दिवस ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले असून नवापूर, तळोदा, धडगाव हे तीनही तालुके कोरोनामुक्त राहिले आहेत.
आता पर्यत जिल्ह्यातून ९१२ स्वॅब नमुने तपा
सणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७८९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आतापर्यंत २१ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आले होते. त्यापैकी २ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून, तब्बल ९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता अॅक्टीव्ह कोरोणा रुग्णाची संख्या १० असुन त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज २२ जणांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले असून, आज दिवसभरात प्राप्त झालेले ८४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही ९८ अहवालांची प्रतिक्षा कायम आहे.