नंदुरबार ( प्रतिनिधी) – आजच्या युगात तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व शाळा बंद आहे मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आज तांत्रिकदृष्ट्या शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नंदुरबारच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने जबाबदारी घेत शिक्षकांना प्रशिक्षण दिले. तंत्रस्नेही शिक्षक आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव देत आहेत.
नंदुरबारच्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत विद्यार्थ्यांना घरी बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
शाळेचे प्राचार्य श्री.मुकुंद इंगळे यांनी या उपक्रमाबाबत बोलतांना सांगितले की, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षाचे नियोजन केले असून, त्यांना विविध शैक्षणिक अनुभव गूगल व झूम फीचर्स द्वारे तसेच विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थांना संकल्पना समजण्यासाठी त्यांना लागणारी ई पुस्तके,पीपीटी, व्हिडिओ आणि कार्यपत्रक देत असतो. यात शिक्षक थेट विद्यार्थ्यांशी संपर्क करीत त्यांना शिकवत असतात. या वर्चुअल लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान आत्मसात होत आहे. याखेरीज 1 एप्रिलला विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा कारकीर्दीचा आढावाही वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे घेण्यात आला. शिक्षकांनी पालकांशी थेट वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे संवाद साधत विद्यार्थ्यांचा गुणपत्रकाची माहिती दिली. यात पालकांशी साधलेल्या चर्चेत थेट वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे पालकांनीही शाळेच्या विलक्षण नियोजनाचे कौतुक केले.
या स्तुत्य उपक्रमासाठी प्राचार्य श्री.मुकुंद इंगळे यांनी पोदार संस्थेचे विश्वस्त श्री.पवन पोदार, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख श्री.आनंद चावला तसेच शाळेला नाविन्यपूर्ण शैक्षणिक योजना हस्तांतरित करणाऱ्या श्रीमती. रेनी बिजलानी व सर्व टीमचे आभार मानले आहेत. या अनोख्या वर्चुअल (वास्तविक) लर्निंग पद्धतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक सुसंवाद साधला जात असून, लॉकडाऊनचा काळातही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत नसून ही मोठ्या समाधानाची बाब म्हणावी लागेल.