नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील दिव्यांगांना लसीकरणासाठी प्राधान्य देऊन त्यांना लसीकरणासाठी प्रतिक्षा करावी लागू नये यासाठी दरमहा पहिला व तिसरा मंगळवार दिव्यांगांच्या लसीकरणासाठी निश्चित करण्यात आलेला आहे.
दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्र व लसीकरणाच्या ठिकाणाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमण्यात आले आहेत. नंदुरबार तालुक्यासाठी राजेश चौधरी (9822118861) भरत पाटील (9822742857), तळोदासाठी विलास राजपूत (8793673880), दुर्गासिंग सोलंकी (9922149088), नवापूरसाठी जगदीश चौधरी (9422782726), बापु पाटील (8262920362), शहादासाठी बाजीराव पाटील (8698948446), धनराज मराठे (9420440434), धडगावसाठी देविदास पाटील (9637684093), राजु पाटील (9822024975) तर अक्कलकुवा तालुक्यासाठी किरण पाटील (9921988764) आणि भालचंद्र पाटील (9325597659) यांचेशी संपर्क साधता येईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या लसीकरण सुविधेचा लाभ घ्यावा आणि तालुका समन्वयक अधिकाऱ्याशी संपर्क साधून लसीकरण केंद्राची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परीषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी केले आहे.