नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सन 2022-2023 या आर्थिक वर्षांसाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली असून या योजनेतंर्गत अनुदान घेवू इच्छिणाऱ्या मदरसांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.