नंदुरबार  (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांनी सन 2022 या वर्षाकरीता तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

होळी गुरुवार 17 मार्च , अनंत चतुर्दशी शुक्रवार 9 सप्टेंबर तसेच दिवाळीचा दुसरा दिवस मंगळवार 25 ऑक्टोबर असे तीन दिवस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी  (न्यायालयीन विभाग वगळून ) सुट्टी असणार आहे.