नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  शासनामार्फत जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या  जिल्हा युवा  पुरस्काराच्या अर्ज स्विकारण्यासाठी  31 मार्च 2021 मुदत वाढविण्यात आलेली आहे. 

इच्छुकांनी विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक  छायांकित कागदपत्रे, वृत्तपत्रे कात्रणे, प्रशस्तीपत्र,चित्रफीत,फोटो आदींसह सादर करावा. अधिक माहितीसाठी मुकेश बारी (भ्रमणध्वनी-8087492382) यांचेशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.