नंदुरबार (जिमाका वृत्त) – फ्रांन्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करावी असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वर्ष 2024 मध्ये आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा ही जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन होणार असून या स्पर्धेत प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्यासाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था आदि संस्थेतील उमेदवारांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.  

यासाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी https://Kaushalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर 7 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी.  स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2002 व त्यानंतरचा असून आवश्यक असून याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार येथे प्रत्यक्ष अथवा  02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.