नंदुरबार येथील ग तु पाटील कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी सप्ताह निमित्ताने हिंदी दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ ए एम पवार सरांनी मार्गदर्शन करतांना हिंदी साहित्यावर प्रकाश टाकून हिंदी चे आपल्या व्यावहारिक जीवनात कसे महत्वाचे स्थान आहे हे विविध उदाहरणाद्वारे पटवून दिले कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एन जे सोमाणी सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ,हिंदी ही आपली राष्ट्र भाषा आहेच त्याच बरोबर हिंदी व्यंगाची भाषा आहे हिंदी ही साहित्याची भाषा आहे हिंदी भाषेच्या विकासासाठी व प्रचारासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एस श्रीवास्तव सरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की ,आपल्या भारतात व भारतासह संपूर्ण जगात सर्वत्र हिंदी भाषा बोलली जाते आपल्या भाषेचा अभिमान आपण बाळगायला हवा व त्याचा विकासासाठी प्रयत्न करावा .तत्पूर्वी खुशी अग्निहोत्री, गायत्री भारत पाटील,मृणाली पाटील , गायत्री बलराज पाटील व अली मोमीन यांनी आपले मनोगत व्यक्त केले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एस डी वाडेकर सर ,व आभार प्रकटन प्रा मोईन शेख यांनी मांडले सदर कार्यक्रमाला प्रा एस डी घाटे सर व विद्यार्थी करोना 19 च्या पर्शवभूमी वर मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उपास्थित होते