नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :-दुर्गम भागातील शेतकऱ्यांना भगर सारख्या शेती उत्पादनाची साठवणूक करता यावी यासाठी शीतगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विकेल ते पिकेल ’ या अभियांनातर्गत आत्मा नोंदणीकृत शेतकरी  गटाकडील शेतमालच्या थेट विक्रीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, तहसिलदार उल्हास देवरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय  कृषी अधिकारी निलेश भागेश्वर आदी उपस्थित होते.

सातपुड्यातील स्ट्रॉबेरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून देऊ आणि उत्पादक शेतकऱ्यांना ब्रँडिंग व विक्रीसाठी सहकार्य करू, असेही पालकमंत्री म्हणाले.