नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा ) : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सर्वंकष माहितीकोषात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती 1 जुलै 2020 या संदर्भ दिनांकास अनुसरुन अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी,नंदुरबार यांनी केले आहे..
माहिती अद्ययावत करण्याचे काम https://des2.mahaonline.gov.in/CGE/logout.do या संकेतस्थळावर करण्यात आले आहे. माहिती कशी भरावी या संदर्भात सूचना संचही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सर्व कार्यालयानी माहितीकोष आज्ञावली वापरण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड 15 सप्टेंबर 2020 पर्यंत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावा. माहिती सादर करून पहिले प्रमाणपत्र 15 डिसेंबर 2020 पर्यंत प्राप्त करुन घ्यावेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्रृटीचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र 16 डिसेंबर 2020 ते 17 मार्च 2021 पर्यंत प्राप्त करुन घ्यावे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष-2020 माहिती प्राप्त झाल्याचे पहिले प्रमाणपत्र जोडल्याशिवाय माहे डिसेंबर 2020 पेन इन जानेवारी 2021 चे वेतन देयक कोषागार कार्यालयात स्विकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय,नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत रुम नंबर 221, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210044, भ्रमणध्वनी क्रमांक 9767263866) वर संपर्क साधावा.