नंदुरबार  (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र पंचायत समिती तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. परीपुर्ण  भरलेले प्रवेश अर्ज 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले  जाणार नाहीत.

विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत जोडावी. दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्य प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

 विद्यार्थ्याचे पालक शासकीय,निमशासकीय सेवेत नसल्याबाबत  तहसिलदार यांचे समक्ष पालकांचे प्रतिज्ञापत्र जोडावे. महिला पालक विधवा,घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय  6 वर्ष  पुर्ण असावे त्याचा जन्म 1 ऑक्टोंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2016 या दरम्यान झालेला असावा. 

अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा (ऑनलाईन) दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र जोडण्यात यावे प्रकलग्रस्त असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. तसेच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ इत्यादी आस्थापनावर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवू नये. भविष्यात लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल, यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष (तळोदा) यांनी केले आहे.