नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कायम विनाअनुदानित, विना अनुदानित व स्वंयअर्थसहाय्यीत शाळांमध्ये (अल्पसंख्याक शिक्षणसंस्था वगळून ) 25 टक्के राखीव जागांसाठी सन 2021-2022 करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 मार्चपासून सुरू होत आहे.
आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून पालकांनी 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे. समाजसेवी संस्था, एनजीओ, शाळा व्यवस्थापकानी यांची नोंद घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.राहुल चौधरी यांनी कळविले आहे.