नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत सहायक आयुक्त संतोष कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी नवरात्रोत्सवात उपवासाच्या काळात बहुतांश भाविक साबुदाणा, भगरीचे सेवन मोठया प्रमाणात करत असल्याने यापुर्वी घडलेल्या विषबाधेसारख्या घटना टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यातील विविध विक्रेत्या व दुकानाची तपासणी करण्यात आली त्यात मे.महालक्षमी किराणा,विसरवाडी, मे.शाम प्रोव्हीजन, विसरवाडी, मे.संतोष किरणा भांडार, नवापूर, मे.अग्रवाल सूपर शॉप, नंदुरबार मे.शांती डिस्ट्रीब्युटर्स, नंदुरबार, मे.रवी सुपर शॉप, नंदुरबार तसेच मे.महेंद्र प्रोव्हीजन,तळोदा, मे.जैन सुपर शॉप,तळोदा येथील दुकाने आस्थापनाची तपासणी करुन भगर,साबुदाणा, तेल,तुपाचे अन्न पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.
सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.